पावसाळीपूर्व कामांसाठी महापालिकेची संयुक्त बैठक   

पुणे: पावसाळ्यात पाणी साठून राहणार्‍या २०१ ठिकाणी उपाय योजना करण्याचे काम सुरु असून मे अखेरपर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. कात्रज आणि जांभुळवाडी तलावातील गाळ काढण्याचे कामही सुरु आहे. काही कामे करण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळावी यासाठी संयुक्त बैठकही आयोजित केली जाणार आहे.
 
पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी आढावा बैठक घेतली. महापालिका, वाहतूक पोलिस यांच्याकडील माहितीनुसार पावसाळ्यात पाणी साठणारी २०१ ठिकाणे निश्चित केली गेली आहे. या ठिकाणी केल्या जाणार्‍या कामांविषयी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी माहिती दिली. ही कामे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन (एनडीए), महापालिका स्तरावर केली जाणार आहे. यातील पहिल्या पॅकेजमध्ये ६६ कामांच्या निविदा काढल्या आहेत. त्यापैकी २१ ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरु आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करता येणार नाही, अशा ठिकाणी  काय उपाययोजना करता येतील याचा विचार सुरु आहे. काही कल्व्हर्ट तोडण्याचाही विचार केला जात आहे. जेथे तातडीने कामच होऊ शकत नाही, अशा ठिकाणी पावसाळ्यात महापालिकेचे पथक तैनात केले जाणार आहे. 
 
कात्रज तलाव रिकामा करण्यास सुुरुवात 
 
आंबिल ओढ्यास सुुरुवात होणारा कात्रज तलाव हा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पुर्ण क्षमतेने वाहतो. यातील काळ काढण्याचे काम सुरु आहे. या तलावातील गाळ काढला जात आहे. सुमारे  १.५ लाख क्यूबिक मीटर गाळ काढायचा आहे, त्यापैकी १० हजार काढला आहे. गाळ काढताना १ मीटर खाली गेली का पाणी बाहेर येत आहे.  मे अखेरपर्यंत गाळ काढायचे काम केले जाणार आहे. या तलावाचा दरवाजा जुना झाला आहे. तो बदलण्याचे काम केले जाणार आहे. तसेच जांभुळवाडी तलावातील गाळ काढला जाणार आहे. तो अद्याप पुर्णपणे महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. परंतु काही तांत्रिक बाबींबुळे पाषाण तलावातील गाळ यावर्षी काढला जाणार नाही, 
 
नाले सफाईचे काम सुरु झाले आहे. नाल्यातील गाळ काढल्याचे आणि तो कोठे टाकला याची तपासणी केल्याशिवाय बिलाचे पैसे दिले जाणार नाही. जिल्हा परिषदेकडून महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या भागातील २० तलाव महापालिकेकडे हस्तांतरीत केले गेले आहे. या तलावांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या तलावातील पाण्याचा पाणीपुरवठ्यासाठी उपयोग करणे तुर्तास शक्य दिसत नाही.

Related Articles